क्षत्रिय मराठा सोसायटीच्या पोलादपूर शाखेचे मंत्री भरत गोगावलेंच्या हस्ते रविवारी उद्घाटन
07-Feb-2025
Total Views |
मुंबई : मध्य कोकण क्षत्रिय मराठा को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड या पोलादपूर येथील नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भाजप विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर भूषविणार आहेत.
आठवण सदन, छत्रपती शिवाजी नगर, पोलादपूर, रायगड येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या उद्घाटन सोहळ्याला विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, अण्णासाहेब सावंत अर्बन बँकेच्या अध्यक्षा शोभा सावंत, हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया, उबाठा शिवसेनेचे नेते हनुमंत जगताप, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, भाजप रायगड सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, पोलादपूर नगराध्यक्षा सोनाली गायकवाड, रायगड जिल्हा बँकेचे संचालक एकनाथ गायकवाड, सभापती अंकिता निकम, शिवाई शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विनोद देशमुख, माजी रा. जी. प. सदस्य चंद्रकांत कळंबे, कीर्तनकार ह. भ. प. रामचंद्र शिंदे, समाजसेवक सुभाष पवार, भाजपा मागाठाणे महामंत्री कृष्णकांत दरेकर, मुंबई बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक संदीप सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती निमंत्रक व क्षत्रिय मराठा को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष राजेश येरुणकर, उपाध्यक्ष अंकुश मोरे, प्रसन्ना पालांडे, राजेश सकपाळ यांनी दिली.