पीडित व्यक्तीला जबरदस्ती बनवले ट्रान्सजेंडर

06 Feb 2025 22:51:38

Transgender
 
लखनऊ : उत्तरप्रदेशातील कानपूरमध्ये एका पीडितावर जबरदस्ती करत ट्रान्सजेंडर (Transgender) बनवण्यात आल्याची घटना समोर आली. यामुळे पोलिसांनी आरोपी ट्रान्सजेंडर कतरिनाला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर तिला अटक करण्यात आले आहे. दरम्यान उत्तर प्रदेश पोलीस या घटनेचा खोलवर तपास करत असल्याची माहिती तपासातून समोर येत आहे.
 
दरम्यान तक्रार दाखल करणाऱ्या पीडितेचे ऑपरेशन कानपूरमधील एका रुग्णालयात केल्याचा पुरावा तपासकर्त्यांना सापडला. या प्रकरणात कानपूरचे डॉ. पुनीत यांचे नाव यामध्ये समाविष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी डॉक्टरही पोलीस कारवाई करण्याच्या निशाण्यावर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात असणारे आरोपी हे सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत असल्याचे बोलले जात आहे.
 
२ जानेवारीपासूनच या प्रकरणाचा वाद समोर आला होता. यामध्ये अटारा, चित्रकूट आणि सिटी कोतवाली परिसरात एका गावातील एका ट्रान्सजेंडरने आरोप केला की, ट्रान्सजेंडर कतरिनाने मधु आणि बन्नो यांनी त्यांच्या साथीदारांसह कानपूरमध्ये जबरदस्तीने त्यांची शस्त्रक्रिया केली.
 
या प्रकरणात कतरिनाने पीडित व्यक्तीला फूस लावून कानपूरमध्ये नेले. त्यानंतर तिथे तिला बेशुद्ध करुन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तसेच नंतर औषध देऊन तिच्यावर अत्याचारही करण्यात आला होता. कतरिनाशिवाय इतर या प्रकरणाला बळी पडलेल्या इतरांनी मधु आणि बन्नो या पीडितांची नावे तक्रारीमध्ये नमूद केली. त्यानंतर आलेल्या अन्य तक्रारदारांच्या माध्यमातूनही डॉ. पुनीतचे नाव समोर आले. आता पोलिसांनी कतरिनाला तुरुंगात डांबण्यात आले. या प्रकरणी आता इतर आरोपींचाही शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणात हे लोक लोकांना फसवून लिंग बदलायचे, अशी माहिती समोर आली.
 
दरम्यान या प्रकरणात आरोपी कतरिनाला तिच्या घरासमोर पोलिसांनी पकडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी एका सूत्रधाराच्या मदतीने कतरिनाची माहिती मिळवली. सखोल चौकशीनंतर मंगळवारी कतरिना बाहेर जातेवेळी पोलिसांच्या ताब्यात आली. 
Powered By Sangraha 9.0