बीड : वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतोस? असा सवाल करत बीडमधील एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असून पीडित तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बीडमधील धारूर गावात ही घटना घडली आहे. अशोक मोहिते नावाचा तरूण त्याच्या मोबाईलवर वाल्मिक कराडशी संबंधित बातम्या पाहत असताना दोन तरूण त्याच्याजवळ आले. वाल्मिक कराडच्या बातम्या का पाहतोस असा सवाल करत त्यांनी त्याला मारहाण केली. वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप अशी आरोपींची नावे असून ते संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे वाचलंत का? - लाडकी बहिण योजना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार!
दरम्यान, या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराड आणि मुंडेंच्या बातम्या पाहिल्यास तुझा संतोष देशमुख करू, अशी धमकी आरोपींकडून अशोक मोहितेला देण्यात आली. तसेच त्याला लाथा, बुक्क्या आणि लोखंडी रॉडने मारहाणही करण्यात आली.