डहाणूमध्ये आढळला दुर्मीळ उडणारा सोनसर्प; चिऱ्यांच्या ट्रॅकमधून...

    05-Feb-2025   
Total Views |

 ornate flying snake rescued from dahanu




मुंबई (विशेष प्रतिनिधी) - डहाणूमध्ये दुर्मीळ उडणारा सोनसर्प म्हणजे 'ओराॅनेट फ्लाईंग स्नेक' आढळून आला आहे (ornate flying snake rescued from dahanu). तालुक्यात सुरू असलेल्या बंगलाच्या बांधकाम परिसरामधून मंगळवार दि. ४ फेब्रुवारी रोजी या सापाचा बचाव करण्यात आला (ornate flying snake rescued from dahanu). फार क्वचितच दिसणारा हा साप महाराष्ट्र सिंधुदुर्ग आणि गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने आढळतो (ornate flying snake rescued from dahanu). बंगल्याच्या बांधकामासाठी कोकणात मागवलेल्या चिऱ्यांच्या ट्रकमधून हा साप डहाणूमध्ये आल्याची शक्यता आहे. (ornate flying snake rescued from dahanu)


उडणारा सोनसर्प हा वृक्षवासी असणारा साप आहे. एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर जाण्यासाठी तो हवेवर तंरगत जातो. म्हणून त्याला फ्लाईंग स्नेक म्हटलं जात. महाराष्ट्रात हा साप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि आंबोली परिसरात तसेच गडचिरोलीच्या जंगलात आढळतो. रायगडमध्ये देखील या सापाचा बचाव केल्याची एक घटना घडली आहे. अशा परिस्थितीत आता या सापाचे दर्शन डहाणूमध्ये झाले आहे. तालुक्यात एका बंगल्याचे बांधकाम सुरू असताना तेथील कामगारांना एका पाईपमध्ये हा साप दिसला. त्यांनी लागलीच याची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाने 'वाईल्डलाईफ वेलफेअर असोसिएशन'च्या (डब्लूडब्लूए) मदतीने या सापाचा बचाव केला.


बंगल्याच्या बांधकामासाठी कोकणातून चिऱ्यांचे ट्रॅक मागविण्यात आले होते. या चिऱ्यांच्या ट्रॅकमधून हा साप याठिकाणी आल्याची शक्यता ठाण्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे वन विभागाच्या परवानगीने या सापाला सिंधुदुर्गमध्येच सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले. उडता सोनसर्प हा लहान तसेच मध्यम आकाराचा साप असून तो निमविषारी आहे. अंगाने काठीसारखा गोल
, सडपातळ आणि त्याच्या पाठीवर गुळगुळीत खवले असतात. खालचा भाग हिरवट असतो. सरपटताना त्याच्या पोटाकडील बाजूच्या खवल्यांना घड्या पडतात. झाडावर चढण्यासाठी त्याला अशा या खवल्यांच्या उपयोग होतो. डोक्यावरील चकचकीत पट्टे असतात. डोके व अंगावरील ही नक्षी अधिवासानुसार निराळी असते.


उडण्याचे तंत्र
शत्रूपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी उडता सोनसर्प हा एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर उडी मारुन जातो. उडी मारतान ते आपले अंग ताणतात व पोट आत ओढून घेतात. त्यामुळे शरीर पसरले जाऊन खालच्या भागात थोडा खोलगट भाग तयार होता. यामुळे ते संथ गतीने तरंगत वरुन खाली येतात, इतर सापांप्रमाणे धपकन खाली पडत नाहीत.

 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.