'छावा' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विकी आणि अक्षय मध्ये अबोलपणा!

    05-Feb-2025
Total Views |

chava movie


मुंबई : विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाच्या दिग्दर्शकाने एक मनोरंजक खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की संपूर्ण शूटिंग दरम्यान विकी कौशल आणि अक्षय खन्ना एकमेकांचा चेहराही पाहू इच्छित नव्हते. असे त्यांनी सांगितले आहे. विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट ट्रेलर २२ जानेवारी रोजी रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. ट्रेलरने चाहत्यांना थक्क केले आणि तेव्हापासून ते छावा चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. अक्षय खन्ना मुघल सम्राट औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाबद्दल मनोरंजक गोष्ट अलिकडेच उघड झाली ‘छावा’च्या संपूर्ण चित्रीकरणादरम्यान विकी आणि अक्षय यांनी कधीही एकमेकांशी संवाद साधला नाही.
अलिकडेच, चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी खुलासा केला की ‘छावा’ चित्रपटात झालेल्या आमनेसामनेपूर्वी विकी कौशल आणि अक्षय कुमार कधीही एमकेमकांना भेटले नव्हते. तो म्हणाला, “ज्या दिवशी त्यांना त्यांचा सीन एकत्र शूट करायचा होता, त्याच दिवशी ते पहिल्यांदा एकमेकांना भेटले आणि तेही पात्र म्हणून.” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दोन्ही कलाकार शूटिंगदरम्यान एकमेकाना ओळख ही दाखवत नव्हते:
दिग्दर्शकाव्यतिरिक्त, विकी कौशलने असेही उघड केले की शूटिंग दरम्यान, अक्षयने औरंगजेबाची भूमिका साकारली होती आणि त्याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती, त्यामुळे त्याने गुड मॉर्निंग, गुडबाय किंवा हॅलो देखील म्हटले नाही. त्यांच्या दृश्याचे चित्रीकरण करताना ते थेट भेटले. विकी कौशल म्हणाला, “विकी कौशल म्हणून अक्षय खन्नासोबत कोणताही संवाद नव्हता.” यादरम्यान, विकी कौशलने सांगितले की, दृश्याच्या गांभीर्यामुळे ते खुर्चीवर एकमेकांच्या शेजारी बसलेही नाहीत. विकी कौशल म्हणाला, “हे नैसर्गिकरित्या घडले नाही. मला आशा आहे की चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी त्याच्याशी बोलू शकेन, परंतु शूटिंग दरम्यान आम्ही कधीही एकमेकांशी बोललो नाही.” असे अभिनेत्याने सांगितले आहे.