उबाठा गटाला धक्का! इंडिगो एअरलाईन्सच्या २००० हून अधिक कर्मचाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

05 Feb 2025 14:25:22
 
Ravindra Chavan
 
मुंबई : इंडिगो एअरलाईन्सच्या २००० हून अधिक कर्मचाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
 
मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी विलेपार्ले विधानसभेचे आमदार पराग अळवणी, एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईजचे ऑल इंडिया अध्यक्ष नितीन जाधव, सरचिटणीस सुहास माटे, योगेश आवळे पस्थित होते.
 
यावेळी बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, "राष्ट्र प्रथम ही भावना समोर ठेऊन भाजप राष्ट्रहितासाठी सदैव तत्पर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा-महायुती सरकार कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे," असे ते म्हणाले. मुख्य बाब म्हणजे या कर्मचाऱ्यांचे युनियन उबाठा गटाशी संबंधित असलेल्या भारतीय कामगार सेनेचा भाग होते. त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
 
यामध्ये युनिट अध्यक्ष करण कांबळे, युनिट सरचिटणीस दिनेश शेवाळे, युनिट उपाध्यक्ष सिराज हाश्मी, युनिट कोषाध्यक्ष चंदन कांडू, संयुक्त खजिनदार मोहम्मद शाहिद हुसेन, युनिट सेक्रेटरी रणजीत नरे, युनिट सेक्रेटरी राकेश कदम, युनिट सेक्रेटरी लक्ष्मण सुरवसे, युनिट सेक्रेटरी विजय यादव, युनिट समिती सदस्य अंकुश निकम, सुनील लोखंडे,अंकुश इंगळे, संदीप कांबळे, शैलेश पवार, सचिन काटकर, सचिन आग, सचिन कांबळे, श्रीनाथ पाडेकर, महबूब पाशा, हर्षद अहिरे, रोहित चतुर्वेदी, ओंकार नाईक, विक्रांत डोईफोडे, विनीत पाटील, संदीप सानप, पूजाताई तांडेल, सपनाताई गोडक्या आदी सदस्य आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0