मुंबई : राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, पहिल्याच टर्ममध्ये एवढी मोठी जबाबदारी मिळाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
हे वाचलंत का? - संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी आयकर विभागाचा छापा!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवरून त्यांचे अभिनंदन केले. "राज्यसभेतील चर्चेला योग्य दिशा देणे, संसदीय कामकाजाची शिस्त कायम राखणे आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडणे यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘तालिका अध्यक्ष’ पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा," असे म्हणत सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या.