ह.भ.प. शिरीष मोरे महाराज यांच्या निधनाने महाराष्ट्र शोकाकुल
05-Feb-2025
Total Views |
पुणे : तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज ह.भ.प. शिरीष मोरे महाराज (Shirish More Maharaj) (वय-३०) यांचे बुधवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी निधन झाले. देहूमधील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. नुकताच त्यांचा विवाह ठरला आणि टीळ्याचा कार्यक्रमही पार पडला होता. मात्र त्याआधीच त्यांचे देहावसान झाले. अर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आली.
संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज, प्रसिध्द व्याख्याते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. शिवव्याख्याते म्हणूनही त्यांचा मोठा नावलौकीक होता. हिंदू सबलीकरण आणि हिंदूंवर होणार्या अत्याचाराबाबत ते कायम भाष्य करत असत. ज्याच्या कपाळावर नाही टिळा, त्यांची खरेदी टाळा, असे ते आवाहन करत. ’लव्ह जिहाद’, ’उद्योग जिहाद’, ’लॅण्ड जिहाद’, ’फूड जिहाद’, धर्मांतरणासारख्या प्रकरणावरही त्यांनी समाजात जनजागृती केली होती. या घटनेने महाराष्ट्रात सर्वत्र शोककळा पसरली आहे.