Maha Kumbh 2025: जया बच्चन यांच्या वक्तव्यावर सोनू निगम संतापले? चुकीची माहिती व्हायरल!

    05-Feb-2025
Total Views |


jaya bacchan
मुंबई : महाकुंभ मेळ्याविषयी जया बच्चन यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा करणारी एक बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. या वृत्तानुसार, जया बच्चन यांनी महाकुंभच्या पाण्याबाबत नकारात्मक टिप्पणी केली आणि तिथे मृतदेह टाकण्यात आल्याचे म्हटले होते. त्यानंतर प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी जया बच्चन यांच्यावर टीका करत अमिताभ बच्चन यांना त्यांच्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी, असे सुचवल्याचा दावा करण्यात आला.
मात्र, सत्य वेगळे आहे. सोनू निगम यांनी स्वतः स्पष्ट केले आहे की, त्यांनी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यांनी तब्बल सात वर्षांपूर्वी ट्विटर वापरणे सोडले असून, राजकीय आणि वादग्रस्त विषयांवर ते प्रतिक्रिया देत नाहीत. एका अज्ञात ट्विटर अकाऊंटवरील पोस्ट चुकीच्या पद्धतीने त्यांच्याशी जोडली गेली. सोनू निगम यांनी या गैरसमजाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या चुकीच्या वृत्तामुळे सोशल मीडियावर मोठा गोंधळ उडाला होता आणि अनेकांनी जया बच्चन यांच्यावर टीका केली होती. मात्र, यामध्ये कोणतेही सत्य नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.
जया बच्चन यांनी काय म्हटले होते?
सोमवारी जया बच्चन यांनी आरोप केला होता की कुंभस्नानाच्या पाण्यात मृतदेह टाकले गेले आहेत, ज्यामुळे पाणी दूषित झाले आहे. त्या म्हणाल्या, "... सध्या सर्वाधिक प्रदूषित पाणी कुठे आहे? ते कुंभमध्ये आहे. चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांची प्रेते नदीत फेकली जात आहेत, त्यामुळे पाणी दूषित झाले आहे..."
त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की "खऱ्या समस्या सोडवण्यात येत नाहीत. कुंभला येणाऱ्या सामान्य लोकांसाठी कोणत्याही विशेष सोयी उपलब्ध नाहीत. प्रशासन म्हणत आहे की येथे कोट्यवधी लोक आले आहेत, पण एका वेळी इतक्या मोठ्या संख्येने लोक कसे एकत्र येऊ शकतात?" योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश प्रशासनावर अनेक खासदारांनी टीका केली आहे. त्यांच्या मते, "प्रशासन व्हीआयपींना विशेष वागणूक देत असून, सामान्य लोकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळेच चेंगराचेंगरी झाली."