दिव्यांग युवतींना गौतम अदानींच्या मुलाकडून १० लाखांची आर्थिक मदत

विवाहाआधी घेतला निर्णय

    05-Feb-2025
Total Views |
 
Gautam Adani
 
गांधीनगर : गौतम अदानी (Gautam Adani) यांचा धाकटा लेक जीत ७ फेब्रुवारी २०२५ रोजी गुजरातमधील अहमदाबादमध्ये दिवा शाहसोबत विवाह करणार आहे. यापूर्वी जीत अदानी यांनी मंगल सेवा करणार असल्याची शपथ घेतली आहे. अदानी समूहाच्या अध्यक्षांनी एक ट्विट करत संबंधित प्रकरणाची माहिती शेअर केली आहे.
 
या प्रकरणी गौतम अदानी म्हणाले की, माझा मुलगा जीत आणि सून दिवा यांचे वैवाहिक जीवन सुरू होईल. जीत आणि दिवा यांनी दरवर्षी ५०० दिव्यांग असलेल्या यवतींच्या विवाहास प्रत्येक युवतीला १० लाख रुपयांची अर्थिक मदत देऊन मंगल सेवा करण्याबाबतचे वचन दिले. वडील म्हणून ही सेवा माझ्यासाठी अगदी समाधानी आणि माझ्या भाग्याची गोष्ट असल्याचे अदानी म्हणाले आहेत.
 
 
 
दरम्यान जीत हे अदानी विमानतळाच्या होल्ंडिंगचे संचालक आहेत. ही भारतातील सर्वात मोठी विमानतळाच्या पायाभूत सुविधांसंबंधित कंपनी आहे. ही कंपनी सध्या ८ विमानतळाचे व्यवस्थापन करते आणि विकास करते. शिवाय ते कंपनीचे संरक्षण, पेट्रोकेमिकल्स आणि तांबे व्यवसायाच्या जबाबदाऱी सांभाळत आहे.