एकनाथ खडसे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! म्हणाले...
05-Feb-2025
Total Views |
मुंबई : शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच आता एकनाथ खडसे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र, त्यांच्या पक्षप्रवेशाला अचानक ब्रेक लागला. त्यानंतर आता एकनाथ खडसे यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी काही इतरही नेते उपस्थित असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या.
मात्र, यावर एकनाथ खडसेंनी स्पष्टीकरण दिले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, "माझ्या मतदारसंघातील विकासकामासंदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या बैठकीत भाजपमध्ये जाण्याबाबत किंवा कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.