मुख्यमंत्री देवे्ंद्र फडणवीसांची वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत महत्वपूर्ण बैठक

राज्यातील विविध प्रकल्पांना गती देण्याबाबत चर्चा

    05-Feb-2025
Total Views |



devendra

 
 

मुंबई : महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची वर्ल्ड बँकेचे कंट्री डायरेक्टर ऑगस्ट कौमे आणि इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनचे दक्षिण आशिया रिजनल हेड इमाद फाखोरे आणि इतर अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीतस मुख्यंमत्र्यांच्या मुख्य सचिव तसेच मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

 
 
 
 

 

या बैठकीतशहरी पाणीपुरवठा, स्वच्छता, पूरव्यवस्थापन, हवामान, राज्यातील शेती व्यवसायाला तंत्रज्ञान आधारित स्मार्ट कृषी धोरण, जिल्हा विकास व कौशल्य विकास, राज्याच्या विकासातील खासगी क्षेत्राची भूमिका, तसेच शाश्वत विकासाच्या तत्वांवर आधारित शहरी विकास, रस्ते व सिंचनासारख्या पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा सक्षम करणे, हरित ऊर्जा क्षेत्राला बळ यांसारख्या महत्वाच्या विषयांवर महत्वपूर्ण चर्चा झाली. राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी अतिशय महत्वाच्या अशा या विषयांवर कशा पध्दतीने काम करणे आवश्यक आहे यासाठीही या बैठकीत चर्चा झाली.
 
 
 
 
 
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील सर्व क्षेत्रांच्या विकासाला चालना देण्यासाठी काम केले जात आहे. यातून महाराष्ट्राच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांचे पाठबळ मिळवून त्यातून विकास प्रकल्पांना गती देणे हे साध्य करणे हेच सरकारचे धोरण आहे. नुकत्याच झालेल्या दावोस परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीच्या शिष्टमंडळाने तब्बल १५ लाख कोटी रुपयांचे विक्रमी सामंजस्य करार केले आहेत. या गुंतवणुक करारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे काम आता सरकारकडून सुरु करण्यात आले आहे.