बांगलादेशी हिंदू युवतीवर कट्टरपंथी रेहानने रेस्टॉरंटमध्ये केले अत्याचार
05-Feb-2025
Total Views |
ढाका : बांगलादेशात एका रेस्टॉरंटमध्ये कट्टरपंथी हृदय रेहान नावाच्या युवकाने बांगलादेशी हिंदू युवतीवर अत्याचार केला. संबंधित युवतीचे नवय हे १९ असून तिने घरी जात आत्महत्या केली आहे. ३० वर्षे आरोपी रेहान बौफल हा उपजिल्हा राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष मोहसीन हवालदार यांचा मुलगा आहे.
मृत बांगलादेशी हिंदू युवती इति दास ही बारीशालमध्ये साहित्य विषयाचे शिक्षण घेत होती. सरस्वती पूजेला तिने आपली उपस्थिती दर्शवली होती. त्यानंतर ती मैत्रिणीसोबत रेस्टॉरंटमध्ये गेली होती. दरम्यान मृत विद्यार्थिनीचे वडील समीर दास यांनी सांगितले की, रेहानने सार्वजनिक ठिकाणी तिचा विनयभंग केला आणि तिच्यावर हल्ला केला.
दरम्यान यानंतर ती तिच्या खोलीत गेली असता, कुटुंबीयांनी तिला जेवणासाठी बोलावले होते. मात्र तिने कोणताही एक प्रतिसाद दिली नाही. यानंतर कुटुंबीयांनी दरवाजा तोडला असता ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. या प्रकरणात आता कट्टरपंथी रेहानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार बरखास्त करण्यात आले. त्यानंतर हिंदूंवरील अन्यायामध्ये वाढ होऊ लागली. त्यानंतर बांगलादेशची धुरा मुहम्मूद युनूस यांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यानंतर हिंदूंवरील होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात बांगलादेशात रान पेटू लागले आहे.