मुंबई : पक्ष संघटना आणि राज्य सरकार यांच्यात योग्य समन्वय राहावा या उद्देशाने भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्य सरकारमधील मंत्र्यांची जिल्हा संपर्क मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर केली. राज्यभरात १७ जिल्ह्यांमध्ये भाजपने संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली आहे.
हे वाचलंत का? - नाथ संप्रदायाची परंपरा ही देशातील सर्वात मोठी परंपरा!
संपर्क मंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे :
गोंदिया जिल्ह्याच्या संपर्क मंत्रीपदी डॉ. पंकज भोयर, बुलढाणा आकाश फुंडकर, यवतमाळ अशोक उईके, वाशीम राधाकृष्ण विखे पाटील, छत्रपती संभाजीनगर अतुल सावे, बीड पंकजा मुंडे, धाराशिव जयकुमार गोरे, हिंगोली मेघना बोर्डीकर, जळगाव गिरीश महाजन, नंदुरबार जयकुमार रावल, मुंबई शहर जिल्हा मंगलप्रभात लोढा, ठाणे गणेश नाईक, रायगड आशिष शेलार, रत्नागिरी नितेश राणे, सातारा शिवेंद्रराजे भोसले, कोल्हापूर माधुरी मिसाळ आणि पुणे जिल्ह्यात चंद्रकांत पाटील यांची संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.