पंतप्रधान मोदी – डोनाल्ड ट्रम्प भेट लवकरच!

    04-Feb-2025
Total Views |

PM MODI 
 
नवी दिल्ली : (PM Narendra Modi) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात व्हाईट हाऊसला भेट देणार आहेत, असे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे.
 
व्हाईट हाऊसचे हे निमंत्रण हे निमंत्रण २७ जानेवारी रोजी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या दूरध्वनी संवादानंतर आले आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी आणि हिंद – प्रशांत क्षेत्रातील सहकार्य आणि क्वाड भागीदारी पुढे नेण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवर भर दिला होता.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १३ फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊ शकतात. फ्रान्सचा दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान मोदी १२ फेब्रुवारी रोजी वॉशिंग्टन डीसीला पोहोचण्याची अपेक्षा आहे. ते १४ फेब्रुवारीपर्यंत अमेरिकेच्या राजधानीत राहतील.
 
५ फेब्रुवारीला पंतप्रधान देणार महाकुंभ मेळ्याला भेट
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. ५ फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याला जाणार असून तेथे ते पवित्र संगमामध्ये स्नान करणार आहेत.