राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा यांच्या ‘टोस्टर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित – विनोद, गोंधळ आणि अनपेक्षित वळणांची मेजवानी!

    04-Feb-2025
Total Views | 31


RAJKUMAR RAO

मुंबई : ‘हिट: द फर्स्ट केस’नंतर तब्बल तीन वर्षांनी राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘टोस्टर’ असून, हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर मुंबईतील एका भव्य कार्यक्रमात लाँच करण्यात आला. चित्रपटाचा टीझर यूट्यूबवर ३ जानेवारीला प्रदर्शित करण्यात आला असून, तो प्रेक्षकांना विनोद आणि अनपेक्षित वळणांची झलक देतो. नेटफ्लिक्सने राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा यांच्या ‘टोस्टर’ चित्रपटाचा अधिकृत टीझर यूट्यूबवर प्रदर्शित केला आहे. त्यासोबत त्यांनी लिहिले, "राजकुमार रावचा वन-टाइम ऑफर – एका टोस्टरसह, अमर्यादित ड्रामा अगदी मोफत! गोंधळ आणि धमाल घेऊन येत आहे ‘टोस्टर’ लवकरच फक्त नेटफ्लिक्सवर."
या ओटीटी चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत राजकुमार आणि सान्यासोबत सीमा पाहवा, अर्चना पूरन सिंग, जितेंद्र जोशी, उपेंद्र लिमये आणि अभिषेक बॅनर्जी देखील झळकणार आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अधिकृत निवेदनात नेटफ्लिक्ससाठी चित्रपटाची निर्मिती करणे एक रोमांचक अनुभव असल्याचे सांगितले. त्यांनी हा चित्रपट एक सतत उत्कंठा वाढवणारी, विनोदी आणि गोंधळाची भन्नाट गोष्ट असल्याचे नमूद केले.
राजकुमार रावने शेअर केले ‘टोस्टर’च्या शूटिंगचा अनुभव :
नेटफ्लिक्सच्या ‘नेक्स्ट ऑन नेटफ्लिक्स' या कार्यक्रमात राजकुमार रावने या चित्रपटाच्या शूटिंगबाबत आपला अनुभव शेअर केला. तो म्हणाला, "आमच्या हातात एक उत्तम स्क्रिप्ट आहे आणि सगळ्यांनी ती वाचल्यानंतर लगेचच तिच्यावर विश्वास ठेवला. सान्याने पटकन फोन करून सांगितले की ही संकल्पना खूप चांगली आहे, आपण करूया, मजा येईल. आम्ही आधीही एकत्र काम केले असल्याने आम्हाला माहित आहे की पुन्हा एकत्र काम करणे खूप धमाल असेल."
'टोस्टर’ हा नेटफ्लिक्सवरील एक मनोरंजक आणि नवनवीन ट्विस्टने भरलेला चित्रपट असेल, अशी अपेक्षा निर्माते आणि कलाकार व्यक्त करत आहेत.




अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121