Saare Jahan Se Accha : नेटफ्लिक्सच्या ‘सारे जहाँ से अच्छा’ या हेरगिरी थरारक मालिकेचा टीझर प्रदर्शित!

    04-Feb-2025
Total Views |



SARE JAHAN SE ACHHA

मुंबई : नेटफ्लिक्सने त्यांच्या आगामी स्पाय थ्रिलर वेब सिरीज ‘सारे जहाँ से अच्छा’ चा पहिला टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रेक्षक या मालिकेबाबत प्रचंड उत्सुक असून, अभिनेता प्रतिक गांधी, क्रितिका कामरा, सनी हिंदुजा, सुहेल नैय्यर, तिलोत्तमा शोम, रजत कपूर आणि अनुप सोनी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. नेटफ्लिक्सने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, "इंटेल मिळालं! ‘सारे जहाँ से अच्छा’ ही आता गुपित राहिलेली नाही. हेर येत आहेत! लवकरच फक्त नेटफ्लिक्सवर."
निर्मात्यांनी सांगितले की, "आम्ही ‘सारे जहाँ से अच्छा’ या आगामी स्पाय थ्रिलरची घोषणा करताना अभिमान वाटतो. ही मालिका गुप्तचर अधिकाऱ्यांना समर्पित आहे, जे आपल्या कर्तव्याच्या मार्गावर सर्वस्वाची बाजी लावतात. त्यांच्या पराक्रमाची आणि बलिदानाची दखल अनेकदा घेतली जात नाही. आम्हाला आनंद आहे की नेटफ्लिक्ससारख्या उत्तम संघासोबत काम करून आम्ही ही कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो."
या मालिकेचे दिग्दर्शन सुमित पुरोहित यांनी केले असून, भावेश मांडलिया, गौरव शुक्ला, सेजल शाह, आदित्य निंबाळकर कार्यकारी निर्माते आहेत. कथालेखनाचे काम भावेश मांडलिया, गौरव शुक्ला, मेघना श्रीवास्तव, अभिजीत खुमान, शिवम शंकर, कुणाल कुशवाह आणि इस्राक शाह यांनी सांभाळले आहे.‘सारे जहाँ से अच्छा’ चा पहिला सिझन लवकरच नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.