नितीन राऊतांचा प्रदेशाध्यक्ष पदावर डोळा! नाना पटोलेंचा पत्ता कट होणार?
04-Feb-2025
Total Views |
मुंबई : पक्षाने संधी दिल्यास प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडेन, असे विधान काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी केले आहे. मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी एका वृत्तवाहिनीशी त्यांनी बोलताना आपली ईच्छा बोलून दाखवली. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोलेंचा पत्ता कट होणार का? अशा चर्चा सुरु आहेत.
नितीन राऊत म्हणाले की, "पक्षाला माझी सेवा घ्यायची असेल तर मी निश्चितपणे काम करेल. मला दिलेली जबाबदारी मी पार पाडेल. विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी सध्या तरी हायकमांडने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. आम्ही सुद्धा त्यांच्या निर्णयाची वाट बघत आहोत. सगळ्या बाबतीत आलेली शिथिलता दूर होण्याच्या दृष्टीने लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे."
"प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोणाच्या नावाची चर्चा आहे याबाबत मला कल्पना नाही. मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मी कधी प्रदेशाध्यक्षपद मागितले नाही पण पक्षाने विश्वास दाखवल्यास ती जबाबदारी पार पाडण्यास मी तयार आहे. प्रदेशाध्यक्ष हा आक्रमक, अभ्यासू, सर्वांना सोबत घेऊन चालणारा आणि संपूर्ण राज्यात ओळख असणारा हवा," असेही ते म्हणाले.