पालिकेच्या अर्थसंकल्पात कोणत्या खात्यासाठी किती तरतूद?
04-Feb-2025
Total Views |
मुंबई : मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नुकताच पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ७४ हजार ४२७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात १४.१९ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात भांडवली विभागासाठी ४३ हजार १६२ कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. महसूल विभागासाठी ३१ हजार २०४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकंदर आकारमानाच्या ५८ टक्के भांडवली तर ४२ टक्के महसुली खर्च आहे. यासोबतच या अर्थसंकल्पात विविध खात्यांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.