तालिबानी युवतींसाठी शिक्षणाची मागणी करणाऱ्या मंत्र्याला सरकारचा विरोध
तालिबान सोडत संयुक्त अरब इमिरातमध्ये झाले निर्वासित
04-Feb-2025
Total Views |
काबुल : अफगाणिस्तानमध्ये महिला आणि मुलींवर अन्याय अत्याचार सुरुच आहे. अफगाणिस्तानात महिलांना अगदी दुय्यम स्थान दिले जाते. तालिबान सरकारचे वर्चस्व असल्याचे आता युवतींना शिक्षण देण्यापासून सरकारने विरोध केला. मात्र तालिबानी सरकारमधील एका मंत्र्याने तालिबानी युवतींना सरकारकडे शिक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र ती मागणी संबंधित मंत्र्याच्या अंगलट आली आहे. त्यामुळे त्यांना अफगाणिस्तानातून पळून जावे लागेल, या संबंधित मंत्र्याचे नाव हे शेर अब्बास स्तानिकझाई असे आहे.
शेर अब्बास हे तालिबान सरकारमध्ये उपपरराष्ट्रमंत्री होते. जानेवारी २०२५ मध्ये शेर अब्बास यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, मुलींसाठी शाळा असाव्यात आणि या बाबतीत इस्लामिक कट्टरपंथी मौलानांचा दृष्टिकोन योग्य नाही. त्यांनी म्हटले होते की महिलांचे शिक्षण थांबवणे हे शारियाच्या नियमानुसार नसल्याचे सांगितले.
Taliban minister 'flees' country as issue of girls' education divides leadership https://t.co/VEeCNEaZx6
या विधानानंतर तालिबान नेता अखंदजादा याने शेर अब्बास यांना अटक करण्याचे आदेश दिल्याचा दावा केला आहे. त्यापूर्वी तो संयुक्त अरब अमिरात रवान झाला असून तो तिथे निर्वासित जीवन जगत आहे.