प्रचाराच्या तोफा थंड अन् आतिशींकडून आचारसंहितेचा भंग
04-Feb-2025
Total Views |
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीला काही तास उरले आहेत. काही तासानंतर मतदार आपल्या लोकशाहीचा अधिकार बजावणार आहेत. निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या असताना मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीमध्ये आचारसंहितेचा भंग केला असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या कालकाजीमध्ये ३ फेब्रुवारी २०२५ रोजी बराच वेळ गोंधळ उडाला. अखेर गोविंदपुरी पोलीस ठाण्यात मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दक्षिण पूर्व दिल्लीच्या पोलिसांनी सांगितले की, आतिशी ४ फेब्रुवारीच्या रात्री फतेह सिंह मार्गावर अनेक वाहने घेऊन लोक दाखल झाले होते. यावेळी १० वाहने आणि ५० ते ६० लोक असल्याची माहिती समोर आली आहे.
जेव्हा पोलिसांनी व्हिडिओ शुट केला तेव्हा दाखल झालेल्या जमावांपैकी आपच्या सदस्यांना त्रास देण्यास सुरूवात केली. याचपार्श्वभूमीवर पोलिसांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी एफआरआय गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
तर दुसरीकडे आतिशी यांनीही दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ज्यात भाजप नेत्याचा मुलगा मनीष बिधुरीने आचारसंहितेचा दावा केला होता. संबंधित बातमी आता सर्वत्र पसरली. मात्र दावा करणारा बिधुरी नसून दिनेश चौधरी असल्याची माहिती समोर आली आहे.