मुंबई : (SEO) विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी महाराष्ट्र सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील समिती या नियुक्ती प्रक्रियेत प्रमुख भूमिका निभावणार आहे. या समितीमध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी सदस्य असतील.
राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या या नियमावलीत पात्रता निकष, जबाबदाऱ्या आणि निवड प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात येईल. तसेच, नियुक्त अधिकाऱ्यांनी शासकीय योजनांचा प्रचार, आपत्ती व्यवस्थापन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत करण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल. या नियुक्ती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांनी शासननिर्धारित अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.