पश्चिम बंगालमध्ये १११ फूट उंच सरस्वती मातेच्या प्रतिमेचे अनावरण

    03-Feb-2025
Total Views |

Saraswati Mata in West Bengal

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Saraswati Mata in West Bengal)
वसंत पंचमी आणि सरस्वती पूजनाचे औचित्य साधून पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील महेशतलाच्या बटानगर येथे १११ फूट उंच उभ्या असलेल्या सरस्वती मातेच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. मूर्तीची रचना बांबू, ज्यूट, थर्माकोल आणि कागदापासून तयार करण्यात आली आहे. शिल्प पूर्ण करण्यासाठी २०० हून अधिक कारागिरांनी तीन महिने अथक परिश्रम घेतले.

हे वाचलंत का? : 'स्वरनाद संगम' कार्यक्रमात ११० स्वयंसेवकांचे घोषवादन

बाटानगर क्रिएशन आणि बटानगर पथकाच्या संयुक्त विद्यमाने सरस्वती पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्थानिक नगरसेवक गोपाल साहा यांनी कारागिरांच्या आव्हानांवर प्रकाश टाकत संरचनेच्या जटिलतेचा उल्लेख केला. साहा यांनी दावा केला की सरस्वती मातेच्या १११ फूट मूर्तीने जागतिक विक्रम केला आहे कारण देशभरात किंवा अगदी जगभर यासारखे दुसरे कोणतेही सरस्वती पंडाल बनवलेले नाही. सुमारे १.५ लाख भाविक पूजा पंडालमध्ये जमले होते. ही मूर्ती बंगालच्या कारागिरांची कलात्मक उत्कृष्टता दर्शवते आणि प्रदेशातील सरस्वती पूजेशी संबंधित खोल सांस्कृतिक आणि धार्मिक उत्साह प्रतिबिंबित करते.