दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे निकाल सुधारण्यासाठी आप नववीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून ठेवते लांब - पंतप्रधान नरेंद्र मोदी

    03-Feb-2025
Total Views |

Narendra Modi
 
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटच्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले की, दिल्लीतील दहावीच्या बोर्डाचे निकाल सुधारण्यासाठी सत्ताधारी आम आदमी पक्ष नववीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. ते दिल्लीतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत असताना म्हणाले आहेत.
 
नरेंद्र मोदी म्हणाले की, दिल्लीतील आप सरकार विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्डाचे निकाल सुधारण्यासाठी नववीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान केले. त्यानंतर पुढे ते म्हणाले की, ज्यांना उत्तीर्ण होण्याबाबत हमी आहे, त्यांनाच पुढे शैक्षणिक प्रगती करण्याची मुभा दिली जाते. ते म्हणाले की, आप सरकारला आपली लाज वाचवण्यासाठी हा सर्व काही खटाटोप करत आहे.
 
 
 
 
त्यानंतर ते म्हणाले की, मी दिल्लीत ऐकले की, नववीनंतर विद्यार्थ्यांना पुढेच जाऊ दिले जात नाही. ज्या मुलांना उत्तीर्ण होण्याची हमी देण्यात आली त्यांनाच शिक्षणाचा पुढील मार्ग मोकळा केला जातो. जर त्यांचा निकाल खराब लागल्यास आप सरकारची प्रतिष्ठा धुळीला मिळू शकते. त्यामुळे त्यांच्या कामामध्ये प्रमाणिकपणा नाही.