धर्मांतर रोखण्यासाठी राजस्थानात कायद्याची विशेष तरतुद, आरोपीस तीन ते दहा वर्षांपर्यंत शिक्षा आणि ५ लाखांचा दंड
03-Feb-2025
Total Views |
जयपूर : धर्मांतरण रोखण्यासाठी राजस्थान राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सोमवारी ३ फेब्रुवारी विधानसभेमध्ये अवैध धर्मांतर, तसेच निकाहसाठी जबरदस्ती केल्यास लव्ह जिहाद समजला जाईल, असे सांगितले. तसेच या प्रकरणात आरोपीला तीन ते दहा वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावली जाईल.
तसेच कौटुंबिक न्यायालय कोणत्यागी व्यक्तीचा विवाह हा रद्द करता येऊ शकतो. आरोपीसाठी हा गुन्हा अजामीनपत्र असल्याचे विधेयकानुसार सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे धर्म स्वीकारू इच्छिणाऱ्या व्यक्तीला ६० दिवसांआधी जिल्हाधिकाऱ्यांना कळवाणे अनिवार्य आहे. जर एखाद्या व्यक्तीचे जबरदस्ती धर्मांतर केल्यास ५ लाखांची नुकसान भरपाई द्यावी लागणार असल्याची कायद्यानुसार तरतुद करण्यात आली.
धर्मांतर रोखण्यासाठी राजस्थानातील हा दुसरा कायदा आहे. याआधी २००८ मध्ये वसुंधरा राजे यांचे सरकार असताना अशाच पद्घतीचा कायदा अमलात आणण्यात आला होता. त्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता भजनलाल शर्मा सरकारने पुन्हा एकदा हा कायदा एका विशिष्ठ तरतुदीसह आणण्यात आला आहे.