मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Jaya Bachchan on Mahakumbh) प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभात देश-विदेशातून मोठ्यासंख्येने भाविक येत आहेत. मकर संक्रांतीपासून सुरु झालेल्या या अध्यात्मिक मेळ्यात वसंत पंचमीपर्यंत ३४.९ कोटी भाविकांनी स्नान केल्याची माहिती आहे. अशातच या भाविकांच्या भावना दुखवणारे वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी केले आहे. सोमवार, दि. ३ जानेवारी रोजी संसद भवन परिसरात माध्यमांशी बोलताना जगातील सर्वात प्रदूषित पाणी महाकुंभामध्ये असल्याचे जया बच्चन यांनी म्हटले.
हे वाचलंत का? : काश्मिरी शैव पंथाचे अभ्यासक डॉ. मार्क एसजी डायकोव्स्की यांचे निधन
त्या म्हणाल्या, "कुंभमध्ये सामान्य लोकांना कोणतेही विशेष वागणूक मिळत नाही. त्यांच्यासाठी कोणतीही खास सुविधा नाही. सरकार खोटे बोलत आहे की कोट्यवधी लोक महाकुंभात पोहोचले आहेत. हे कसे काय शक्य आहे? इतक्या संख्येत लोक तिथे कसे काय येतील? उलट तेथील मृतदेह उचलून पाण्यात फेकल्याने तेथील पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकार जलशक्तीबाबत जे काही बोलत आहे ते सर्व फालतू चर्चा आहे."