कट्टरपंथी अफताबने हिंदू युवतींना अडकवले वैश्याव्यवसायाच्या जाळ्यात

गाडीवर बजरंग बली असे नाव लिहित वावरत होता हिंदुबहुल भागात

    03-Feb-2025
Total Views |
 
Hindu
 
पटना : बिहारमधील पूर्णिमामधील हिंदू (Hindu) युवतींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले आहे. कट्टरपंथी अफताब हा मुलींना फसवत होता. हा संबंधित युवक सेक्स रॅकेटशी निगडीत होता. आपण भगवान हनुमानाचे भक्त असल्याचे भासवत हिंदू युवतींना फसवले. एवढेच नाहीतर त्याने आपले खरे नाव अफताब ही मुळ ओळख लपवत आपण अंकीत असल्याचे सांगत हिंदू ओळख पटवून दिली.
 
प्रसारमाध्यमाच्या एका वृत्तानुसार. २९ जानेवारी २०२५ रोजी पूर्णियामधील काटिहार मोडमधील परिसरात टाकण्यात आलेल्या ११ अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. त्यांना वेश्याव्यवयात ढकलण्यात आले होते. मात्र या प्रकरणात लक्ष घालत पोलिसांनी ३२ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये एकूण ६ पुरुष आणि २६ महिलांचा समावेश असल्याचे वृत्त समोर आलेले आहे.
 
पूर्णियाच्या रेड लाईट भागात सुटका करण्यात आलेल्या एका युवतीमुळे संपूर्ण प्रकरणाची खरी परिस्थिती उघड झाली. या टोळीचा म्होरक्या अफताब खान असल्याची माहिती पीडितेने प्रसारमाध्यमाला बोलत असताना सांगितली. त्याने आपले नाव बदलत अंकीत असे नामांतरण केले. एक गाडी खरेदी केली होती. त्यावर जय बजरंग बली लिहिलेले दिसत होते.
 
 
 
अफताब आपल्या खोट्या नावाच्या मदतीने स्वत:ला कट्टर हिंदू म्हणवून घेत असे, यानंतर त्याने हिंदू युवतींना फसवले. त्यांच्यासोबत निकाहाचेही आमिष दाखवले होते. त्यांना धमकावून वैश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. या प्रकरणात अफताब खानसोबत इतर तिघांचाही समावेश आहे. त्यांनी हिंदू नामांतरण केल्याची माहिती समोर आली आहे.
 
एकाचे नाव हे मोहम्मद साकिब आहे, त्याने आपले नाव बदलत राजीव साह अशी ओळख सांगितली. साकीब हा वेगवेगळ्या भागातून मुली आणायचा आणि त्यांना वैश्याव्यवसायात कामला लावत असे. यासोबत आता मौसम खानने आपले नाव बदलत ऋषभ साह अशी ओळख सांगयाचा. तो अनेक मोबाईल नंबरचा वापर करत मुलींशी मैत्री करत त्यांना वैश्याव्यवसाय करण्यास भाग पाडायचा. हिंदूबहुल भागामध्ये वावरण्यासाठी त्यांनी आपल्या नावाचे नामांतरण केले असल्याचे तपासादरम्यान उघड आले.
 
या प्रकरणातून सुटका करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलींना पोलिसांनी बालसुधारगृहामध्ये दाखल केले. तर इतरांना पोलिसांनी तुरुंगात डांबले. पोलियांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहेत. मुख्य आरोपी अफताब सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.