ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांनी दिली राजभवनातील ऐतिहासिक वास्तूंना भेट!

03 Feb 2025 18:11:38
 
Image
 
मुंबई : राणी एलिझाबेथ द्वितीय आणि ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचे सर्वात धाकटे सुपुत्र तसेच राजे चार्ल्स तृतीय यांचे धाकटे बंधू असलेल्या प्रिन्स एडवर्ड यांनी राजभवनातील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वारसा वास्तूंना भेट दिली.
 
ते सध्या मुंबई दौऱ्यावर असून रविवार, २ फेब्रुवारी रोजी त्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी ब्रिटनचे उप-उच्चायुक्त हरजिंदर कांग, ड्यूक यांचे खाजगी सचिव अ‍ॅलेक्स पॉट्स आणि राजकीय आणि द्विपक्षीय व्यवहार विभागप्रमुख जॉन निकेल हेदेखील उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  काँग्रेस हायकमांडने छाटले नाना पटोलेंचे पंख!
 
दरम्यान, प्रिन्स एडवर्ड यांनी राजभवन येथील पूर्वी जमिनीखाली तोपखाना असलेल्या हिरवळीची पाहणी केली. सन १९८० या हिरवळीवर एडवर्ड यांचे ज्येष्ठ बंधू प्रिन्स ऑफ वेल्स चार्ल्स यांच्या सन्मानार्थ साली चहापान झाले होते. तसेच यावेळी एडवर्ड यांनी 'राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठी राखीव राखीव असलेल्या जल लक्षण या अतिथिगृहाला भेट दिली. सन १९६१ साली या अतिथीगृहात राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचा मुक्काम होता.
 
 
 
Powered By Sangraha 9.0