वाल्मिक समाज आणि वंचित समाज आम आदमी पक्षाविरोधात दिल्लीत आक्रमक
प्रचार करणाऱ्या वाहनाची तोडफोड
03-Feb-2025
Total Views |
नवी दिल्ली : वाल्मिक समाज आणि वंचित महापंचायतच्या सदस्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Vidhansabha 2025) पार्श्वभूमीवर आपविरोधात आंदोलन केले आहे. या निदर्शनादरम्यान, दिल्लीतील लेडी हार्डिंग हॉस्पिटलजवळून जात असलेल्या आपच्या निवडणूक प्रचार करणाऱ्या वाहनाची आंदोलकांनी तोडफोड आंदोलकांनी तोडफोड केली.
याचपार्श्वभूमीवर आता राज्य वाल्मिकी समाजाचे अध्यक्ष आशु पोहस यांनी असंतोष व्यक्त केला. आमच्या समाजाची लूट झाली आहे. आमच्या आई बहिणींना आणि मुलींना पैसे देण्याचे खोटे आश्वासन दिल्याचा आरोप केजरीवाल आणि आपविरोधात करण्यात आला. ज्या लोकांनी आमच्या समाजाला साथ देण्यास नकार दिला त्यांना आम्ही पाठिंबा देणार नाही. आम्ही त्यांच्यावर बहिष्कार टाकणार आहे. अवघ्या भारत देशाला माहिती आहे की, अरविंद केजरीवाल हे एक खोटे मुख्यमंत्री आहेत. आमच्या वंचित समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आम्ही आता केजरीवाल यांना सोडणार नाही. दिल्लीतील वाढत्या प्रदुषणाला केजरीवाल आणि आप जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यानंतर पुढे बोलताना त्यांनी भाष्य केले की, शिक्षण विभागाने वाल्मिकी समाजातील १०० विद्यार्थ्यांना परदेशामध्ये पाठविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते सहज शक्य झाले नाही. आंदोलक सदस्यांनी केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या प्रचाराच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे.