सोनिया गांधींविरोधात विशेषाधिकार भंगाची मागणी

03 Feb 2025 18:48:51
 
Sonia Gandhi
 
नवी दिल्ली : भाजपच्या एकूण ४० खासदारांनी सोमवारी ३ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्यसभेच्या सभापतींची भेट घेतली. प्रसारमाध्यमानुसार, भाजप नेते आता काँग्रेस नेत्या सोनिया गांधींविरोधात विशेषाधिकार भंग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहेत. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर सोनिया गांधी यांनी गरीब असा उल्लेख केला होता. तर दुसरीकडे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी अभिभाषणास कंटाळवाणे असल्याचे भाष्य केले.
 
या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने काँग्रेसवर पलटवार केला. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भारतातील आदिवासी समाजाचा हा अवमान आहे. तेव्हा राष्ट्रपती भवनात प्रेस सचिवांनी विरोध दर्शवला होता. ते म्हणाले होते की, विरोधी खासदारांचे विधान हे दुर्देवी आणि राष्ट्रपतींच्या प्रतिषेठाल धक्का पोहोचवणारे कृत्य आहे.
 
नेमक्या काय म्हणाल्या सोनिया गांधी?
 
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यां केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ च्या पार्श्वभूमीवर अभिभाषण केले होते.  त्यावर त्यांनी भाजपने केलेल्या योजनांचा आणि विकासकामांचा पाढा वाचून दाखवला होता. यावेळी त्यांना दमल्यासरखे झाले होते. त्या अभिभाषणावर सोनिया गांधी यांनी पुअर म्हणत प्रसारमाध्यमांसमोर भाष्य केले. तसेच दुसरीकडे लेक राहुल गांधी यांनी भाषण कंटाळवाणे असल्याचे भाष्य केले. नंतर त्या म्हणाल्या की त्या खूपच थकल्या होत्या मोठा प्रयत्न करत त्या बोलत होत्या. सोनिया गांधी यांच्या प्रतिक्रियेदरम्यान प्रियंका गांधी-वाड्रा आणि राहुल गांधी त्याठिकाणी उपस्थित होते. 
 
 
Powered By Sangraha 9.0