नूतनीकृत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुल २ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला!

28 Feb 2025 14:19:51

pula 1

मुंबई : बहुप्रतिक्षीत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुलाच्या उद्घाटन समारंभ दि. २ मार्च रोजी पार पडणार असल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. बदलत्या काळासोबत, कलेचे वेगवेगळे प्रवाह आत्मसात करून पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी अद्यावत सोयी सुविधांसहीत सज्ज झाली आहे.
 
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते नूतनीकृत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलाचे लोकार्पण होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती समारंभाला लाभणार आहे.नाट्य, चित्रपट, चित्र, शिल्प यांसह संपूर्ण सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर सोहळ्याला उपस्थित राहणार असून यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. प्रख्यात अभिनेते संजय मोने, पुष्कर श्रोत्री, सुभाष नकाशे, गायक नंदेश उमप, रोहन पाटील यांच्यासहीत अन्य कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.

 
Powered By Sangraha 9.0