त्याग-समर्पण- बलिदानाची प्रेरणा म्हणजे स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण!
आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वांत उंच पुतळ्याचे पाद्यपूजन
28-Feb-2025
Total Views | 37
पुणे : पिंपरी-चिंचवड येथील बोऱ्हाडेवाडी-मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा 'स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण' उभारण्यात येत असून आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते या पुतळ्याचे पाद्यपूजन करण्यात आले. त्याग-समर्पण- बलिदानाची प्रेरणा म्हणजे स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण असल्याची भावना महेश लांडगे यांनी व्यक्त केली.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बोऱ्हाडेवाडी-मोशी येथे संभाजीराजांचा जगातील सर्वांत उंच पुतळा अर्थात 'स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण'चे काम प्रगतीपथावर आहे. महाराजांच्या पुतळ्याचे पाद्यपूजन करण्यात आले. योगायोगाने आजपासूनच आपल्या राजाचा बलिदान मास सुरू होतो आहे. देव-देश अन् धर्मासाठी मरावे कसे..? याची शिकवण देणाऱ्या महाराजांचे कार्य अजरामर आहे. त्याची प्रेरणा सदैव या शंभूसृष्टीमधून मिळेल," असा विश्वास याप्रसंगी महेश लांडगे यांनी व्यक्त केला. वाटतो.