त्याग-समर्पण- बलिदानाची प्रेरणा म्हणजे स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण!

28 Feb 2025 15:45:29
 
Mahesh Landge
 
पुणे : पिंपरी-चिंचवड येथील बोऱ्हाडेवाडी-मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा 'स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण' उभारण्यात येत असून आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते या पुतळ्याचे पाद्यपूजन करण्यात आले. त्याग-समर्पण- बलिदानाची प्रेरणा म्हणजे स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण असल्याची भावना महेश लांडगे यांनी व्यक्त केली. 
 
हे वाचलंत का? -  मंत्री योगेश कदमांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
 
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बोऱ्हाडेवाडी-मोशी येथे संभाजीराजांचा जगातील सर्वांत उंच पुतळा अर्थात 'स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण'चे काम प्रगतीपथावर आहे. महाराजांच्या पुतळ्याचे पाद्यपूजन करण्यात आले. योगायोगाने आजपासूनच आपल्या राजाचा बलिदान मास सुरू होतो आहे. देव-देश अन्‌ धर्मासाठी मरावे कसे..? याची शिकवण देणाऱ्या महाराजांचे कार्य अजरामर आहे. त्याची प्रेरणा सदैव या शंभूसृष्टीमधून मिळेल," असा विश्वास याप्रसंगी महेश लांडगे यांनी व्यक्त केला. वाटतो.
 
 
 
Powered By Sangraha 9.0