लखनऊ : उत्तर प्रदेशातील जामा मशीद (Jama Masjid) प्रकरणावरून न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने मशीद कमिटीच्या एका याचिकेवर सुनावणी केली. त्यावर न्यायालयाने धार्मिक संरचनेच्या (जामा मशीद) आत कोणतेही रंगरंगोटीचे काम करता येणार नाही असा आदेश दिला आहे. आता फक्त मशीद समितीला मशिदीच्या संबंधित जागेची स्वच्छता करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सांगण्यात येत आहे की, संभल मशीद समितीकडून अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक याचिका दाखल केली. त्या याचिकेत मशिदीच्या रंगरंगोटीबाबत परवानगी मागण्यात आली होती. मात्र, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. या अहवालात सांगण्यात आले की, मशिदीच्या ढाच्यामध्ये संरचनात्मक अशी कोणतीही एक समस्या नाही. ज्यामुळे रंगरंगोटी करणे आवश्यक नसल्याची सुनावणी करण्यात आली आहे. आता या प्रकरणावरच पुढील सुनावणी ही ५ मार्च रोजी करण्यात आली आहे.
हे प्रकरण लक्षात घेता, मशीद समितीने रामजानच्या पार्श्वभूमीवर दुरूस्तीची परवानी देण्याची मागणी केली होती. यानंतर आता न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या मशिदीस भेट देत रमजानपूर्वी मशिदीच्या सजावटीसाठी आवश्यक असलेली कारणे पाहण्यास आदेश जारी केले आहेत. यासाठी आता एएसआयच्या तीन जणांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. ज्यात मशिदीचीही तपासणी करण्यात आली.