पुणे : स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज, कपडे, मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली. आरोपीने पीडित मुलीचा गळा आवळत तिच्यावर दोनदा बलात्कार केल्याचा युक्तीवाद करण्यात आला. आरोपीवर याआधीही ६ गुन्हे दाखल असल्याचेही सरकारी वकिलांकडून कोर्टात सांगण्यात आले. दरम्यान, आरोपीच्या अधिक तपासासाठी पोलिसांकडून १४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती.
हे वाचलंत का? - रुग्णालय परिसरांमध्ये महापालिकेकडून 'विशेष स्वच्छता मोहीम'
मात्र, दोघांमध्येही सहमतीने शारीरिक संबंध असल्याचा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये तरुणी स्वत:हून बसमध्ये जात असल्याचे दिसत असल्याचेही आरोपीच्या वकिलाने म्हटले आहे. वकील वजीदखान बीडकर, साजिद खान यांनी आरोपीच्या वतीने युक्तीवाद केला.