लखनऊ : प्रयागराज महाकुंभमध्ये (Mahakumbh Mela 2025) उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी डुबकी न लावल्याने ते हिंदू नसल्याचा दावा मंत्री रामदास आठवलेंनी केला. ते महाकुंभच्या शेवटच्या दिवशी दि : २७ फेब्रुवारी २०२५ रोजी बोलत होते. करोडो हिंदूंनी महाकुंभात डुबकी मारली मात्र, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी डुबकी न मारल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली.
ते म्हणाले की, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे साहेब महाकुंभात गेले नाहीत. राहुल गांधी हिंदू आणि उद्धव ठाकरे हिंदू आहेत की नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे आता हिंदू लोक त्यांना येणाऱ्या निवडणुकीत मत देणार नाहीत, असे प्रतिपादन केले. त्यानंतर ते म्हणाले की, त्यांना महाकुंभला न जाण्याचा पश्चात्ताप नक्कीच होईल, असे रामदास आठवले यांनी वक्तव्य केले.
ते म्हणाले की, महाकुंभ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही नाही. हा महाकुंभ हिंदू धर्मातील भाविकांचा आहे. १४४ वर्षानंतर हा महाकुंभमेळा आला होता. त्यामुळे त्या नेत्यांना महाकुंभात जाण्याची आवश्यकता होती. परंतु ते गेले नाहीत, आता जनतेने त्यांना सत्तेतून बाहेर काढले. आता जनताच त्यांना चांगलाच धड शिकवेल, असे प्रतिपादन रामदास आठवले यांनी केले होते.