गोवंश हत्येचा कट - मुंब्र्याच्या लांडग्यांचा डाव येऊरवासींनी उधळला

27 Feb 2025 22:49:35
 
महाशिवरात्री
 
ठाणे : महाशिवरात्रीच्या दिवशी मुंब्यातील धर्मांध लांडग्यानी रचलेला गो वंश हत्येचा कट येऊर वासियांनी उधळून लावल्याची घटना ठाण्यातील येऊर परिसरात घडली. येऊर गावातील पाटोण पाडा येथील शेतकरी विलास रघुनाथ बरफ यांच्या दोन बैलांना इंजेक्शन मारून बेशुद्ध करून नेण्याचा या धर्मांधांचा डाव होता. मात्र स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे रंगेहाथ तावडीत सापडलेल्या एकाला वर्तकनगर पोलिसांच्या हवाली केले. मुंब्र्यातील या आरोपीच्या चौकशीत मुंब्यातीलच अन्य नऊ आरोपीची नावे उघड झाली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांच्या मुसक्या आवळल्या असुन उर्वरीत आरोपींचा शोध सुरू आहे.
 
वर्तकनगर पोलीस स्थानकात दाखल गुन्हयानुसार, येऊरच्या पाटोण पाडा येथील विलास बरफ या शेतकऱ्याच्या गोठ्यात पाच बैल, चार गाई आहेत. दररोज सकाळी आठ वाजता ते गुराढोरांना चारा चारण्यासाठी येऊरच्या जंगलात सोडतात. सायंकाळी ७.३० पर्यंत सर्व जनांवरे चरून गोठयात परतात. परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी नेहमीप्रमाणे जनावरांना चरण्यासाठी जंगलात सोडले असता दोन बैल गोठ्यात परतलेच नाहीत. दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता फोन आला की, काही लोक इंजेक्शन टोचून बैलांना बेशुद्ध करून चोरून नेत आहेत. तेव्हा, येऊर गावातील ग्रामस्थांनी त्याना अटकाव करून फरमान रियाज शेख यास पकडले, उर्वरीत आरोपी एका चारचाकी गाडीतुन पसार झाले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता अदनान अनीस सैयद, आयानी आसाद अन्सारी, सीराज उर्फ बील्ली, नौशाद, शफीक, आल्तमस, शायान शेख, अजहर, अप्पु ही उर्वरित आरोपीची नावे समोर आली. यापैकी एक वगळता सर्व आरोपी मुंब्रा येथील रहिवासी आहेत. या सर्व आरोपींविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६० अन्वये कलम ११(१)(a), कलम ११(१)(c) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये कलम ६२, ३०३(२), ३(५) अंगर्तग गुन्हे दाखल करण्यात आले असुन पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोन्ही बैल सध्या सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
इंजेक्शन देऊन गो वंश हत्येचा कट
येऊर तसेच ग्रामीण परिसरात इंजेक्शन देऊन गो वंश जनावरांना बेशुद्ध करीत पळवुन नेणाऱ्या टोळ्या कार्यरत असल्याची सुत्रांची माहिती आहे. यात धर्माध जिहादी सोबत काही गो वंश संवर्धनातील कार्यकर्तेही सामील असल्याच्या वदंता आहेत. तेव्हा, पोलीसांनी या प्रकरणी कसुन तपास करण्याची मागणी होत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0