लॉरेन्स बिश्नोई टोळीतील गुन्हेगाराचा पोलिसांकडून एनकाउंटर

26 Feb 2025 16:34:39
 
Lawrence Bishnoi
लखनऊ : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या (Lawrence Bishnoi) टोळीतील जीतू नावाच्या एका गुन्हेगाराचा एनकाउंटर करण्यात आला आहे. जीतूला पकडल्यास १ लाखांचे बक्षीस देण्यात येईल, अशी माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली होती. जीतू हा पेरॉलवर बाहेर आल्यानंतर तो फरार झाला. त्यानंतर त्याचा एनकाउंटर करण्यात आला आहे.
 
जीतूचा एनकाउंटर हा मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास झाला. पोलिसांनी त्याला घेरा घालत ताब्यात घेतले. त्यानंतर जितेंद्रला पोलिसांनी सरेंडर होण्यास सांगितले. मात्र जितेंद्रने पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींवर गोळीबार केला असल्याचे संबंधित कारवाईमध्ये नमूद करण्यात आले आहे.
 
 
 
सांगण्यात येत आहे की, जितेंद्रवर अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ज्यात दोन वेळा मर्डर, २०१६ मध्ये या प्रकरणात त्याला कारावासाची शिक्षा देण्यात आली होती. त्यानंतर २०२३ या वर्षात तो पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर तो पुन्हा तुरूंगात गेला नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी अनेक युक्त्या केल्या. पोलीस त्यांच्याच मागावर होते. अखेर तो पोलिसांच्या हाती लागला.
 
 
Powered By Sangraha 9.0