ठाणे: (Niranjan Davkhare) भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक समन्वय आघाडी आणि समन्वय प्रतिष्ठानच्यावतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने पवित्र व मंगलमय वातावरण आणि मंत्रोच्चारात होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान पार पडले. या अनुष्ठानात उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरातुन आणलेल्या ज्योतीतून होमातील अग्नि प्रज्वलीत करण्यात आला. भाजपाचे आ. निरंजन डावखरे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे यंदा पाचवे वर्ष होते.
१५१ दांपत्यांनी या अनुष्ठानात सहभाग दर्शविला. त्यानंतर महादेवाच्या आराधनेबरोबरच ठाणेकरांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. आचार्य आशिषकुमार जानी यांनी पौराहित्य केलेल्या या कार्यक्रमाला आ.संजय केळकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व भाविकांनी उपस्थिती दर्शवली.
महाशिवरात्रीचे औचित्य साधून ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात महाशिवरात्रीनिमित्ताने आयोजित होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानात १५१ दांपत्यांनी सहभाग घेतला. तत्पूर्वी उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरातुन खास होमासाठी आणलेल्या पवित्र शिवज्योतीची सकाळी शंखनाद, डमरूनाद आणि ढोल ताश्यांच्या वादनासह मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर अत्यंत पवित्र व वातावरणात होमामध्ये ज्योतीतून अग्नि प्रज्वलित करून आहुती देण्यात आली.आचार्य आशिषकुमार जानी यांनी पौराहित्य केलेल्या या धार्मिक कार्यक्रमात दिवसभरात शेकडो ठाणेकरांनी शिवलिंगाचे दर्शन घेऊन अभिषेक करीत होमात आहुती दिली. सायंकाळी नादब्रह्म प्रस्तुत गायक मुकुंद मराठे आणि प्राजक्ता मराठे यांनी "जय शंकरा... गंगाधरा !" हा संगीत कार्यक्रम तद्नंतर श्री गणेश नृत्य कला मंदिर प्रस्तुत प्रिया देव आणि संचाच्या "शिव नृत्यदर्शन" या कार्यक्रमाला ज्येष्ठ नृत्यांगना डॉ. मंजिरी देव यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.तर रात्रौ ८ ते ९ या कालावधीत शिवतांडव आणि अघोरी नृत्य सादर केल्यानंतर "महाशिवआरती" करून कार्यक्रमाचा समारोप झाला.