कल्याण: vaibhav Gaikwad भाजपचे माजी आ. गणपत गायकवाड यांनी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले आहे. या दोषारोप पत्रातून माजी आ. गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड यांचे नाव वगळण्यात आले आहे. एका जमिनीच्या वादातून माजी आ. गणपत गायकवाड यांनी माजी नगरसेवक गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. ही घटना दि. २ फेबुवारी २०२४ रोजी घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी आ. गायकवाड यांना अटक केली. सध्या ते तळोजा कारागृहात आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांनी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. या प्रकरणात पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केले आहे. या दोषारोप पत्रातून आ. गायकवाड यांचे सुपुत्र वैभव याचे नाव वगळण्यात आले आहे. वैभवचा या गुन्ह्यात कोणताही सहभाग आढळून आला नाही, असे दोषारोप पत्रात म्हटले आहे. पण, पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात वैभव याचे नाव होते. वैभव हा घटना घडल्यापासून पोलिसांना आढळून आला नव्हता.