मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sharia Law in Bangladesh?) बांगलादेशातील मोहम्मद युनूस सरकारच्या गैरकृत्यांमुळे याठिकाणी इस्लामिक कट्टरतावाद मोठ्याप्रमाणात वाढल्याचे दिसते आहे. हिंदूंना उघड-उघडपणे लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. मंदिरे उद्ध्वस्त करून लुटली जात असतानाही युनूस सरकार मूग गिळून गप्प आहे. याचाच फायदा घेत इस्लामिक कट्टरपंथी हिंदूंविरोधात उघडपणे विष ओकत आहेत. यासंदर्भातील एक व्हिडिओ नुकताच सोशवल मिडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये एक कट्टरपंथी युवक हिंदूंना जाहीरपणे धमकी देत बांगलादेशात शरीया कायदा चारणार असल्याचे म्हणत आहे.
हे वाचलंत का? : अजमेर दर्ग्यात महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा होणार?
हिंदू व्हॉइस या ट्विटर (पूर्वीचे एक्स) हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून सदर व्हिडिओ कधीचा आहे याबाबत स्पष्टता आलेली नाही. मात्र व्हायरल व्हिडिओतून हे स्पष्ट होते आहे की, इस्लामिक कट्टरपंथी हिंदूंना धमकी देत असून आतापासून बांगलादेशमध्ये फक्त शरिया कायदा आणि न्यायालये चालतील, असे म्हणत आहेत. जर कोणी अल्लाह आणि त्याचा प्रेषित मुहम्मद यांचा अपमान करणे हे त्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानत असेल तर त्याचा शिरच्छेद करण्याचे स्वातंत्र्य आपल्या हातात आहे, असेही पुढे कट्टरपंथी युवकाने म्हटले आहे.
तस्लिमा नसरीन यांचे पुस्तक बांगलादेशात विकू दिले जाणार नाही
तस्लिमा नसरीन यांचे कोणतेही पुस्तक बांगलादेशात विकू देणार नाही, अशी धमकीही कट्टरवाद्यांनी दिली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जो कोणी कुराण सुन्नाच्या, अल्लाहच्या प्रतिष्ठेच्या आणि शेवटच्या प्रेषित मुहम्मद यांच्या विरोधात बोलेल, आम्ही त्यांना कापण्यास स्वतंत्र आहोत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अलीकडेच तस्लिमा नसरीन यांचे एक पुस्तक कट्टरपंथींनी बांगलादेशातील पुस्तक मेळ्यात विकले जाण्यापासून रोखले होते.