लठ्ठपणा कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभियान, उमर अब्दुल्लांचाही अभियानात समावेश

24 Feb 2025 15:24:31
 
Narendra Modi 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लठ्ठपणाविरोधात एक अभियान सुरू केले आहे. त्यांनी १० मोठ्या सेलिब्रिटींना या अभियानात समाविष्ट होण्याचा सल्ला दिला. या अभियानासंबंधित माहिती सोशल मीडियावरील X अकाउंटवर आहे. आपल्या खाद्यपदार्थात तेलाचा वापर १० % कमी करा, असे नरेंद्र मोदींनी सांगितले आहे.
 
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी देशातील काही सेलिब्रिटींना सांगितले की, त्यांनी १०-१० वेगवेगळ्या लोकांना या अभियानात घेतल्यास हे अभियान आणखी मोठे होईल. या अभियानातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान देणाऱ्यांमध्ये खालीलपैकी १० व्यक्तीचा समावेश केला असून पुढीलप्रमाणे :
 
आनंद महिंद्रा - महिंद्र समुह चेअरमन
उमर अब्दुल्ला - मुख्यमंत्री जम्मू-काश्मीर
मनु भाकर - ऑलंम्पिक विजेत्या
मीराबाई चानू- ऑलंम्पिक विजेत्या वेटलिफ्टर
मोहनलाल - अभिनेता आणि निर्माता
नंदन नीलेकणी – इंफोसिस सह-संस्थापक
आर माधवन – अभिनेता
श्रेया घोषाल – गायिका
दिनेश लाल यादव निरहुआ – अभिनेता आणि खासदार
सुधा मूर्ति – इंफोसिस फाउंडेशन
 
 
 
लठ्ठपणामुळे अनेक आजार निर्माण होतात. जसे की, ह्रदयाचा झटका, डायबिटीज स्ट्रोक, मानसिक स्वास्थ्य लठ्ठपणा निर्माण झाल्याने असे आजार निर्माण होण्याची शक्यता असते. त्याविरोधात मोदींनी हे अभियान सुरू केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0