गांधीनगर : चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू असून २३ फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये टीम इंडिया विरूद्ध पाकिस्तान यांच्यात लढत झाली. यावेळी टीम इंडियाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत विजय मिळवला. याचाच आनंद भारतीयांच्या पोटात मावेनासा झाला. देशातील काही शहरांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. मात्र, देशद्रोहींना टीम इंडियाचा विजय पचनी पडला नाही. गुजरातच्या अहमदाबादमध्ये रविवारी टीम इंडियाच्या विजयाने अनेकांनी जल्लोष केला. मात्र, यावेळी पोटशूळ उठलेल्या कट्टरपंथींनी जल्लोष करणाऱ्या भारतीयांवर दगडफेक केली.
दगडफेक करणारे एक-दोन नाहीतर तब्बल १५-२० कट्टरपंथी मुस्लिमांचा जमाव होता. दरम्यान एका अवहालानुसार सांगण्यात आले की, सुरुवातीला भारताने टीम इंडिया विजयी झाल्याने फटाके उडवले. मात्र त्यावरून दोन कट्टरपंथींनी वाद घालण्यास सुरूवात केली. काही वेळानंतर कट्टरपंथींचा जमाव जमला आणि त्यांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. या दगडफेकीत ६-७ निष्पापांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दगडफेक करणारे कट्टरपंथी घटनास्थळावरून निघून गेले.
दरम्यान, या घडलेल्या घटनेमुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाची माहिती जाणून घेतली. तसेच चौकशी सुरू करण्यात आली होती. मात्र अद्यापही कोणालाही अटक करण्यात आली नाही. या घटनेनंतर दुखापतग्रस्तांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.