मुंबई : मराठी नाट्यसृष्टीतला सर्वोच्च आदराचा झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात यंदा ‘ज्याची त्याची लव्हस्टोरी’, ‘असेन मी नसेन मी’, ‘शिकायला गेलो एक’, ‘वरवरचे वधूवर’, ‘विषामृत’ अशा अनेक नाट्यकृतींमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळाली. अखेरीस, सोहळा संपन्न झाल्यानंतर आता विजेत्या कलाकारांची नावे हळूहळू उलगडू लागली आहेत.
‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेची फेम अभिनेत्री शर्मिला शिंदे ‘ज्याची त्याची लव्हस्टोरी’ या नाटकात ‘आरती’ ही विनोदी व्यक्तिरेखा साकारत आहे. या भुमिकेसाठी शर्मिलाला यंदाच्या ‘झी नाट्य गौरव पुरस्कार’ सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री’चा अवॉर्ड मिळाला आहे. यानिमित्ताने सविस्तर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने सर्वांचे आभार मानले आहेत.
शर्मिला शिंदेने सोशल मिडीयावर केली 'ही' पोस्ट:
“तू करू शकतेस, तुझ्यात ती ताकद आहे” असं मला चंद्रकांत लोकरे दादाने नाटकाच्या प्रोसेस मध्ये एकदा खास बसवून सांगितलं होतं. काही लोकांच्या सक्सेस स्टोरीजची उदाहरणं जोडत मला पक्क मोटीवेट केलं होतं. आता चंदू दादाने आपल्यावर दाखवलेला विश्वास चुकीचा ठरू द्यायचा नाही आणि चंदू दादाला हरू द्यायचं नाही असं ठरवलं आणि तिथेच ‘आरती’ हे पात्र साकारण्याचा माझा बेस तयार झाला.
प्रियदर्शन जाधवबरोबर काम करायची इच्छा माझ्या मनात काही वर्षांपासून होती. तशी ती मेसेजद्वारे मी एकदा व्यक्त सुद्धा केली होती. अखेर ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’च्या निमित्ताने ती पूर्ण झाली. दर्शनकडून खूप काही शिकायला मिळालं. तो सांगेल तसं परफॉर्म करण्याचा प्रयत्न करत राहिले. “लेखकाशी एवढ्या गप्पा कुठला आर्टिस्ट कधी मारत नाही” असं मला एकदा आमचा लेखक ऋषिकांत राऊत म्हणाला होता. पण, ‘आरती’सारखं पात्र लिहिणाऱ्या लेखकाशी तर मला अजून खूप बोलायचं आहे. मी खूप लकी आहे की, ते साकारण्याची संधी मला मिळाली. तुझ्या पहिल्याच व्यावसायिक नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार मिळाला. तुझ अभिनंदन.
मृणाल देशपांडेने डिझाइन केलेल्या लूकमुळे आरती मध्ये शिरणं एकदम सोपं होऊन जातं. मयुरेश केळुस्कर दर्शनची असिस्टेंट डायरेक्टर म्हणून तू जशी साथ दिली आहेस तशीच साथ, मदत तुझी मला पण झाली. आकाश, नितिन, निलेश, आदू तुम्ही दिलेला टेक्निकल सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे. त्यासाठी तुमचे मनापासून आभार.
पूर्णानंद वांधेकर… पूर्णा तुझ्याशिवाय आरती पूर्ण झालीच नसती. तू आरतीचा खरा बेटर हाफ आहेस. तिचा हाफ होऊन तिला तू कंपलीट केलं आहेस. माझी ऑन स्टेज इतकी साथ दिल्याबद्दल तुझी खूप खूप आभारी आहे मी. तीन मुली एकत्र एका मेकअप रूममध्ये, एका प्रोजेक्ट मध्ये न भांडता इतक्या प्रेमाने राहू शकत नाही असं म्हणणाऱ्या लोकांच्या नाकावर टिचून मी, सुरुची अडारकर आणि शर्वरी कुलकर्णी या नाटकात मजा करतो. यू आर माय पावर पफ गल्स. खुप प्रेम.
}