CBSE बोर्ड शाळेच्या आवारात अवैधपणे मदरशांचे शिक्षण

22 Feb 2025 18:43:22
 
Madrasa
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील मलीहाबादमध्ये सफा पब्लिक स्कूल या सीबीएसई शाळेत इयत्ता ५ वीच्या १५ वर्षीय विद्यार्थी अल्तमस खानचा मृतदेह हा एका दोरीच्या फासाला अडकवण्यात आल्याचे सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांसह आता राज्य अल्पसंख्यांक कल्याण विभाग या प्रकरणाचा तपास करत आहेत. या शाळेच्या अवारात अवैधपणे मदरशाचे शिक्षण दिले जात होते. आता संबंधित मदरशाचाही तपास करण्यात येणार आहे.
 
या शाळेचे प्रबंधक अरशद खान आहेत. अल्तमशचा भाऊ खान अब्दुल कुद्दुस यांच्या तक्रारीवरून, मलिहाबाद पोलिसांनी प्राचार्य अँथनी थॉमस. शाळेचे व्यवस्थापक अर्शद खान आणि अब्दुल हफिजसह अनेक लोकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. प्राथमिक तपासात असे निदर्शनास आले की, शाळेत आलेल्या मदरशामध्ये आखाती देशांकडून लाखो रुपयांचा निधी मिळत होता. 
 
एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार, शाळेच्या परिसरात एक मशीद बांधण्यात आल्याचे तपासातून समोर आले. मशिदीत दिवसातून पाच वेळा नमाज अदा केली जाते. त्याच्या वसतिगृहात ४३ मुले विद्यार्थी वास्तव्य करतात. सध्या १३ मुले परीक्षा देण्यासाठी गेली आहेत. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, दोन वर्षांपूर्वी शाळेच्या परिसरात स्वातंत्र्यदिनाऐवजी १४ ऑगस्ट रोजी म्हणजे पाकिस्तानचा ध्वज फडकवण्यात आला होता.
 
Powered By Sangraha 9.0