3 दिवस आधी अनारक्षित तिकिट बुक करता येणार

21 Feb 2025 14:21:14

westrn railway
मुंबई, दि.२० : प्रतिनधी पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी उपनगरीय नसलेल्या इतर विभागातील २०० किमी पेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी तीन दिवस आधी (प्रवासाचा दिवस वगळता) अनारक्षित तिकिटे बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा सर्व अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) काउंटरवर उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रवाशांना तिकिटे बुक करण्याची सोय आणि सुविधा मिळेल.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमाचे उद्दिष्ट होळी, दिवाळी, उन्हाळी/हिवाळी सुट्ट्या, ख्रिसमस आणि इतर सुट्ट्यांसारख्या गर्दीच्या हंगामात तिकीट काउंटरवरील गर्दी आणि रांगा कमी करणे आहे. पश्चिम रेल्वे प्रवाशांना यूटीएस बुकिंग विंडोमध्ये शेवटच्या क्षणी गर्दी टाळण्यासाठी आणि त्रासमुक्त प्रवासाचा आनंद घेण्यासाठी या आगाऊ बुकिंग सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.
मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी माहिती दिली की, अनेक प्रवाशांना अजूनही या सोयीस्कर तरतुदीची माहिती नाही आणि पश्चिम रेल्वे त्याबद्दल जागरूकता पसरविण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. ही सुविधा विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फायदेशीर आहे, कारण ती त्यांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यास आणि आगाऊ तिकिटे बुक करण्यास मदत करते. यामुळे गर्दीच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळेल.
Powered By Sangraha 9.0