नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीचा अपघात (Sourav Ganguly accident) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुर्गापूर महामार्गावरून त्याच्यासोबत असणाऱ्या ताफ्यासोबत वर्धमानला जात असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये सौरव गांगुली थोडक्यात बचावला गेला. ही घटना गुरूवारी दुपारी घडली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या ताफ्याच्या मध्यभागी एक लॉरी आली, ज्यामुळे वाहनांचा आपत्कालीन ब्रेक लावावा लागला. त्यामुळे आता सौरव गांगुली बचावला गेला आहे. यावेळी मागील असणाऱ्या गाड्या गांगुलीच्या वाहनांना आदळल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यावेळी दुर्गापूर एक्सप्रेस महामार्गावर मुसळधार पाऊस पडत होता. त्यावेळी हा अपघात झाला असून अपघातात वाहनाची धडक अगदी सौम्य पद्धतीची होती. यावेळी कोणालाही जखम झाली नाही. ताफ्यातील वाहनांचे किरकोळ नुकसान झाले. अपघातानंतर, गांगुलीला सुमारे १० मिनिटे महामार्गावर थांबावे लागले. परंतु परिस्थिती सामान्य स्थितीत होताच त्याने आपला प्रवास सुरू केला.
यावेळी गांगुलीने कोणत्याही अडचणीशिवाय आपला प्रवास सुरू केला. वर्धमानला पोहोचल्यानंतर त्यांनी विद्यापीठात एका कार्यक्रमामध्ये भाग घेतला. यानंतर तो वर्धमान स्पोर्ट्स असोशिएशनने आयोजित केलेल्या आणखी एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाला.