वसंतपंचमीनिमित्त पंढरपूरात विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा संपन्न!
02-Feb-2025
Total Views |
मुंबई : वसंतपंचमीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी यांचा स्वर्गीय विवाह सोहळा ( Vitthal Rukmini Marriage Ceremony ) दि. २ फेब्रुवारी रोजी पार पडला. मंदिराच्या आवारात हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती दिसली. या लग्न सोहळ्यासाठी १०० हून अधिक कारागिरांनी मंदिर सजावट केली. विवाह सोहळ्यासाठी विठ्ठल रुक्मिणीला विशेष दागिन्यांनी नटवण्यात आले होते.
वसंतपंचमीच्या मुहूर्तावर प्रतिवर्षी विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा साजरा केला जातो. यावर्षीदेखील हा सोहळा तितक्याच उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती. विठ्ठल रुक्मिणी विवाहासाठी उत्कृष्ट अशी वस्त्रे, दागदागिने, अलंकार वापरण्यात आले. विठ्ठल व रुक्मिणी यांच्यामध्ये अंतरपाट धरुन मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला.
विठ्ठल रुक्मिणीच्या डोक्यावर अक्षता पडल्यावर भाविकांमध्ये जल्लोष दिसून आला. भक्तगणांनी नाचून आपला आनंद व्यक्त केला. लग्न सोहळ्यासाठी विठ्ठल रुक्मिणीला खास पोषाखाने नटवले. या सोहळ्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर आकर्षक फुलांच्या सजावटीने सजवण्यात आलं. अशा पद्धतीने विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा पार पडला.