महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा लागू होईल... : डॉ. निलम गोऱ्हे
02-Feb-2025
Total Views |
मुंबई : राज्यात लवकरच समान नागरी कायदा ( Uniform Civil Code ) लागू होईल असे विधान विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. लिंगभाव समानता आणण्यासाठी देशात समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे, त्यातून महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा लागू होईल. विश्व मराठी संमेलनात त्यांनी असे संकेत दिले आहेत.
संपूर्ण भारत देशात समान नागरी कायद्याची मागणी करण्यात येत आहे. नुकताच उत्तराखंड सरकारने समान नागरी कायदा लागू केला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी विश्व मराठी संमेलनात महिलांविषयक कायदे व न्याय मराठी भाषा या विषयी संवाद साधला. यामध्ये बोलताना समान नागरी कायद्याविषयी देखील विधान केले.
महाराष्ट्रात देखील समान नागरी कायदा लागू होईल हे विधान करताना त्यांनी महिलांविषयी असलेल्या न्याय कायद्यांविषयी भाष्य केले. न्यायदेवता डोळ्यावरील पट्टी काढून महिलांना न्याय देण्याचे काम करीत असल्याचे त्या म्हणाल्या. या कायद्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटेल असेदेखील त्यांनी सांगितले.