मुंबई : फिल्म हेरिटेज फाउंडेशन, विम वेन्डर्स स्टिफ्टुंग आणि मॅक्स म्युलर भवन मुंबई यांच्या सहयोगाने 'विम वेन्डर्स – किंग ऑफ द रोड इंडिया टूर' या विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन ५ फेब्रुवारी पासून करण्यात येईल. जागतिक सिनेसृष्टीतील महान दिग्दर्शकांपैकी एक, ऑस्कर नामांकन मिळालेले आणि पाल्मे डी’ओर, गोल्डन लायन व बाफ्टा यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार जिंकलेले विम वेन्डर्स प्रथमच भारतात येत आहेत. मुंबई, पुणे, तिरुवनंतपुरम, कोलकाता आणि दिल्ली या पाच शहरांमध्ये ५ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२५ दरम्यान एकूण १८ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
१९७० च्या दशकातील 'न्यू जर्मन सिनेमा' च्या प्रवर्तकांपैकी एक असलेले वेन्डर्स आजच्या काळातील सर्वोच्च दर्जाच्या चित्रपट दिग्दर्शकांमध्ये गणले जातात. पटकथा लेखक, दिग्दर्शक, निर्माता, छायाचित्रकार आणि लेखक अशा विविध भूमिकांमध्ये त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या पॅरिस, टेक्सास १९८४ आणि विंग्स ऑफ डिझायर १९८७ या सिनेमांचा समावेश आंतरराष्ट्रीय चित्रपट वारसात केला जातो. तसेच पिना, ब्युएना व्हिस्टा सोशल क्लब आणि द सॉल्ट ऑफ द अर्थ यांसारखे दस्तऐवजीकरणपटही अत्यंत लोकप्रिय ठरले.
२०२३ मध्ये कॅन्स चित्रपट महोत्सवात त्यांच्या दोन चित्रपटांचे जागतिक प्रीमियर झाले. जर्मन कलाकार अँझेल्म कीफर यांच्यावर आधारित ३डी माहितीपट आणि परफेक्ट डेज, एक जपानी चित्रपट, ज्यामध्ये मुख्य अभिनेता कोजी याकुशो यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. परफेक्ट डेज हा वेन्डर्स यांचा सर्वाधिक यशस्वी आंतरराष्ट्रीय चित्रपट ठरला आणि २०२४ च्या ऑस्करसाठी 'आंतरराष्ट्रीय वैशिष्ट्य चित्रपट' या श्रेणीमध्ये नामांकित झाला.
या अभूतपूर्व चित्रपट महोत्सवात विम वेन्डर्स यांच्या पन्नासहून अधिक वर्षांच्या कारकिर्दीतील १८ चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्यांच्या द गोलकीपर’स अँझायटी ॲट द पेनल्टी किक १९७१ या पहिल्या चित्रपटापासून ते ३डी मध्ये तयार झालेल्या त्यांच्या नव्या अँझेल्म चित्रपटापर्यंत अनेक वैशिष्ट्यपूर्ण, लघुपट आणि माहितीपटांचा समावेश असेल. प्रेक्षकांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे. वेन्डर्स यांच्या प्रसिद्ध रस्त्यावरील चित्रपटांप्रमाणेच, हा महोत्सवही त्यांच्या देशभरातील प्रवासासोबत जोडलेला असेल. वेन्डर्स विविध शहरांमध्ये जाऊन प्रेक्षकांशी संवाद साधतील तसेच चित्रपट विद्यार्थ्यांशी आणि फिल्म इंडस्ट्रीशी विशेष संवाद साधतील.
चित्रपट महोत्सवात दाखवले जाणारे १८ चित्रपट :
१. पेनल्टी किकवेळी गोलकिपरची घालमेल (१९७१)
२. अॅलिस इन द सिटीज (१९७३)
३. किंग्स ऑफ द रोड (१९७५)
४. द अमेरिकन फ्रेंड (१९७७)
५. लाइटनिंग ओव्हर वॉटर (१९८०)
६. रिव्हर्स अँगल (१९८२)
७. रूम ६६६ (१९८२)
८. द स्टेट ऑफ थिंग्स (१९८२)
९. पॅरिस, टेक्सास (१९८४)
१०. टोकियो-गा (१९८५)
११. विंग्स ऑफ डिझायर (१९८७)
१२. अन्टिल द एंड ऑफ द वर्ल्ड – दिग्दर्शकाची आवृत्ती (१९९४)
१३. द एंड ऑफ वायोलन्स (१९९७)
१४. ब्युएना व्हिस्टा सोशल क्लब (१९९९)
१५. द मिलियन डॉलर हॉटेल (२०००)
१६. डोंट कम नॉकिंग (२००४)
१७. पिना (२०११)